क्राईम डायरीबीड

अवैध वाहतुक करणारी जनावरांची गाडी पकडली

बीड /प्रतिनिधी

पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकास गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे या पथकाने मांजरसुंभा चौकात सापळा रचून ४९जनावरांची सुटका केली. यात गायी व वासरांचा समावेश आहे.
खडकत (ता. आष्टी) येथून तीन वाहनांमध्ये अवैधरीत्या गाई, वासरे अशी ४९ जनावरे वाहतूक केल्याचे पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या पथकातील प्रमुख विलास हजारे यांना माहिती मिळाली. त्या आधारे त्यांनी मांजरसुंभा चौकात सापळा रचला. यावेळी त्यांनी दोन पिकअप व आयशर टेम्पो थांबवला असता त्यांनी अवैधरित्यागाई, वासरे असेअसे ४९ जनावरे वाहून नेत असल्याचे आढळून आले. वाहने ताब्यात घेऊन जनावरांचे सुटका करण्यात आली. याप्रकरणी आरोपींच्या विरोधात नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!