अंबाजोगाईक्राईम डायरी

किरकोळ कारणावरून एकास मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

अंबाजोगाई:  किरकोळ कारणावरून एकास बेदम मारहाण झाल्याची घटना संत रविदास नगर येथे घडली. याप्रकरणी चौघा विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

समर्थ नगर येथील तुषार रामभाऊ सातपुते (वय: २०) हा युवक चनई रोडवर असलेल्या संत रविदास नगर येथे आला होता. आरोपींनी तू मामाचा मुलगा अजिंक्य बोबडे याच्या सोबत का आलास म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. बेल्टने पाठीवर व डोक्याला मारहाण केली. याप्रकरणी तुषार रामभाऊ सातपुते याच्या फिर्यादीवरुन सचिन जनार्दन वाघमारे, राजेंद्र घोडके, अमोल जनार्दन वाघमारे, अतुल माने (सर्व रा. संत रविदास नगर चनई) यांच्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक चौधरी पुढील तपास करीत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!