जिल्ह्याचं राजकारणपाटोदा

पाटोद्यात जयदत्त धस यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन

पाटोदा/अजीज शेख:
ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाले असुन ओबीसी समाजाचे आरक्षण परत मिळविण्यासाठी दिं २६/६/२०२१ रोजी सकाळी ११ वाजता राज मंहमद चौक,पाटोदा येथे युवा नेते जयदत्त धस यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले. आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे संपुर्ण ओ.बी.सी,समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले असुन रद्द झालेले ओ.बी.सी.समाजाचे राजकीय आरक्षण परत मिळावे या साठी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली व आमदार सुरेश आण्णा धस यांच्या आदेशावरुन दिनांक २६/६/२०२१ शनिवार रोजी सकाळी ११ वाजता पाटोदा येथे राजमहमंद चौकात युवा नेते जयदत्त धस यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम ठीय्या आंदोलन करण्यात आले.

या वेळी जयदत्त धस,माऊली जरांगे व महेंद्र गर्जे यांनी ओ.बी.सी.आरक्षण विषयी आघाडी सरकारवर कडाडुन टीका केली. या वेळी मा.जि.प अध्यक्ष सय्यद आब्बुशेठ,मा.जिल्हा प.सभापती महेंद्र गर्जे,जिल्हा.प.सदस्य. माऊली जरांगे,पंचायत समिती सदस्य महेंद्र नागरगोजे,मा.नगराध्यक्ष बळीराम पोटे,ॲड.जब्बार पठाण,आसिफ सौदागर,श्रीहरी गिते बापु, शेख आसेफ,वसीम शेख, महेंद्र नागरगोजे,नय्युम पठाण,बालाजी जाधव, भाऊसाहेब भवर,सोमीनाथ कोल्हे,राजु जाधव,सतिष पाटील,आमोल दिक्षीत, रामेश्वर जाधव,सुनिल नाईकनवरे,बाळु जावळे, नानासाहेब डिडुळ,सुभाष पाखरे,लक्ष्मण सस्ते,पदमाकर घुमरे,मारोती दळवी,सतीष घोलप,सुशिल ढोले,रोहीदास गिते,बापु नवले,आदम सय्यद,विष्णु भाकरे,राजेंद्र येवले, खय्यूम शेठ,शेख फय्युम, शेठ शफी मास्तर सय्यद, मुसा सय्यद हासन,देविदास खोटे,अजिज शेख,
सय्यद शप्पुशेठ,अरविंद सरोदे,लक्ष्मण घोलप,महादेव जाधव,अनु ढोले,बगा जाधव,किशोर आडागळे,कीशोर नागरगोजे,शेख रियाज,जितेंद्र भोसले,जितेंद्र सांगळे,दिनेश नारायणकर,शाम अडागळे,पाटोदा शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी नायब तहसिलदार सुनिल ढाकणे,पोलीस निरीक्षक महेश आंधळे व नायब तहसिलदार टाक साहेब यांनी निवेदन स्विकारले.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!