क्राईम डायरीगेवराई
दोघांवर चाकूहल्ला

गेवराई /प्रतिनिधी:
आमच्या नातेवाईकास घरात लपवून का ठेवले, असे म्हणत दोघांवर चाकूने हल्ला चढविल्याची घटना १८ रोजी धोंडराई कॅम्प परिसरात घडली. अर्जुन साहेबराव शिंदे (६०) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, नातेवाईकास घरात लपवून ठेवल्याचा आरोप करत अर्जुन शिंदे व त्यांचा भाच सुनील माळी यांच्यावर चाकूहल्ला करण्यात आला. नितीन धनगर, वैजीनाथ धनगर, ज्ञानेश्वर धनगर, पंढरीनाथ धनगर,मारोती धनगर यांच्यावर गेवराई ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.