अंबाजोगाईक्राईम डायरी
देव दर्शनासाठी बाहेर पडले, अन् सापडला मृतदेह

अंबाजोगाई: तालुक्यातील चिचखंडी येथील बाबुराव गडदे यांचा मृतदेह चिचखंडी शिवारात गुरुवारी दि. 10 सापडल्याने खळबळ उडाली होती. मयत बाबुराव गडदे हे गावाबाहेरच्या मंदीरात दर्शन घेऊन येतो म्हणून घराबाहेर पडले होते.
दर्शनासाठी बाहेर पडलेले बाबुराव गडदे चार वाजले तरी देखील घर परत आले नाहीत. तेंव्हा घरच्यांनी शोधाशोध केली असता गडदेवाडी शिवारात रोडपासुन शंभर मिटर अंतरावर नदीच्या पात्रात कोणीतरी अज्ञातांनी डोक्यात मोठा दगड घातलेला रक्त भंबाळ अवस्थेतील खून केलेला मृतदेह आढळून आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत. पैकी एक मुलगा उसतोडणीस कारखान्याला गेलेला आहे. तर एक मुलगा शिक्षण घेत आहे.