यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात पीपीटी व पोस्टर सादरीकरण स्पर्धा संपन्न

अंबाजोगाई: यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई येथील वाणिज्य विभागामार्फत दिनांक २० मे २०२२ रोजी पोस्टर सादरीकरण जिल्हास्तरीयस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेला जिल्हास्तरावर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. बीड जिल्ह्यातील र भ अट्टल कॉलेज गेवराई, कला वाणिज्य महाविद्यालय घाटनांदुर, कै. शंकरराव गुट्टे ग्रामीण कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय धर्मापुरी, खोलेश्वर महाविद्यालय अंबाजोगाई, स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय अंबाजोगाई येथील विद्यार्थ्यांचा सहभाग प्राप्त झाला. पीपीटी सादरीकरण स्पर्धेकरिता एकूण सहा विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षरीत्या तर दहा विद्यार्थ्यांनी ऑनलाइन सादरीकरण केले. पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेकरिता पाच विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष तर अकरा विद्यार्थ्यांनी ऑनलाइन सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती होती. तर परीक्षक म्हणून ग्रंथपाल सुनील भोसले व डॉ. अरविंद घोडके यांनी विशेष जबाबदारी पार पाडली. प्राचार्य शिवदास शिरसाट यांनी विद्यार्थ्यांनी ‘वेळोवेळी महाविद्यालयाच्या उपक्रमातून दिल्या जाणाऱ्या संधीचे सोने करण्याचे’ आव्हान केले. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाकरिता तसेच सर्वांगीण विकासाकरिता अशा विविध स्पर्धा महत्त्वाच्या असतात असे त्यांनी याप्रसंगी सांगितले. डॉ राजाभाऊ भगत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धेचे आयोजन वाणिज्य विभागामार्फत करण्यात आले होते. वाणिज्य विभाग प्रमुख डॉ इंद्रजीत रामदास भगत यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ रामेश्वर जगदाळे, नरेंद्र चोले, श्रीपाद कदम, दिगंबर वंडकर व अमोल सोळुंके यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ रमेश शिंदे, उपप्राचार्य प्रताप जाधव, डॉ मुकूंद राजपंखे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.