अंबाजोगाई

जि. प. च्या शाळेतील अऍल्युमिनियम खिडक्या व इतर साहित्याची चोरी

७२ हजाराचा माल लंपास;

अंबाजोगाई: २ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेत चोरट्यांनी कोणीही नसल्याचा फायदा घेत शाळेच्या खिडक्यांना बसवण्यात आलेल्या ऍल्युमिनियम पटांसह, दारे, शैक्षणिक साहित्याची चोरी केली. या प्रकरणी फिर्याद देण्यासाठी गेलेल्या मुख्याध्यापकांना पोलिसांनी फिर्याद न घेताच धुडकावून लावले तर नंतर आ. संजय दौंड यांनी पोलिसांना फोन करुन विचारणा करताच मुख्याध्यापकांना बोलावून घेवून गुन्हा दाखल केला.

अंबाजोगाई शहरात बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची मोठी जागा आहे. या जागेत जिल्हा परीषदेच्या उपाध्यक्ष पदाचा कार्यभार सौ. आशा संजय दौंड याचे कडे असतांना दोन कोटी रुपये खर्चून शाळेची मोठी इमारत बांधली आहे. या शाळेत कर्मचारी कमी असल्यामुळे व पाहरेक-याचे पद नसल्यामुळे रात्री कोणीही नसते. याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी १५ दिवसांपूर्वी शाळेच्या १५ खिडक्यांना बसवण्यात आलेली ऍल्युमिनियमची तावदाने अंदाजे किंमत ४५ हजार, ६ दारे अंदाजे किंमत १२ हजार, शैक्षणिक साहित्य १५ हजार असे एकुण ७२ हजाराची चोरी झाली.

 तक्रारच घेतली नाही ! 
सदरील घटना घडल्यानंतर या शाळेचे मुख्याध्यापक जोगदंड यांनी रीतसर अर्ज लिहुन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेले असता पोलीसांनी तक्रारच दाखल करुन घेतली नाही. उलट त्यांना चोरीस गेलेल्या साहित्याच्या पावत्या घेवून या. तुम्ही वॉचमन का ठेवला नाही, सिसी टिव्ही का लावला नाही अशा प्रश्नांचा भडिमार केला असल्याचे मुख्याध्यापक जोगदंड यांनी सांगितले.

▪️आं.दौड यांच्या फोन नंतर
दाखल झाला गुन्हा

या प्रकरणाचा सविस्तर वृत्तांत गटशिक्षणाधिकारी राऊत आणि मुख्याध्यापक जोगदंड यांनी आ. संजय दौंड यांची प्रतृयक्ष भेट घेवून सांगितल्यानंतर आ. संजय दौंड यांनी पोलीस निरीक्षक बालासाहेब पवार यांची कान उघडणी करुन सांगितल्यानंतर या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी संशयितांना तात्काळ हस्तगत करुन चोरीचा तपास लावावा अशा सुचना आ. संजय दौंड यांनी पोलिसांना केल्या आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!