अंबाजोगाई

ज्येष्ठ नागरिक संघाकडून घाटशीळ पारगाव येथील घटनेचा निषेध

अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन

अंबाजोगाई/प्रतिनिधी:
घाटशीळ पारगाव येथील घटनेचा अंबाजोगाई ज्येष्ठ नागरिक संघाकडून निषेध करण्यात आला.याबाबत अप्पर जिल्हाधिकारी,अंबाजोगाई यांना ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने गुरूवार,दिनांक २४ जून रोजी सदरील घटनेचा निषेध करणारे निवेदन देण्यात आले.

ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,जन्मदात्या आई-वडीलांना मुलाने विनाकारण,अमानुषपणे काठीने मारहाण केली.ही घटना घाटशीळ पारगाव (ता.शिरूर कासार,जि.बीड) येथे नुकतीच घडली आहे.या घटनेत आई जागेवरच मृत्यू पावल्या तर वडील यांना अहमदनगर जिल्ह्यातील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून तेही मृत्यूशी झुंज देत आहेत.अशा प्रकारच्या दुर्दैवी वाईट घटना समाजात घडू नयेत.आधुनिक समाज व्यवस्थेत आई-वडील,जेष्ठ नागरिकांचा सन्मान करावा परंतू,समाजात माञ विपरीत घटना घडत आहेत.याचा निषेध करीत असल्याचे सदरील निवेदनात नमूद करण्यात आले आहे.ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने निवेदन देताना डॉ.दामोदर थोरात,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पुंडलिक पवार,कार्याध्यक्ष ॲड.अनंतराव जगतकर,सचिव मनोहर कदम,शिवाजी शिंदे हे उपस्थित होते.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!