अमरसिंह पंडित यांच्या कडून मिरगाव येथील गोडबोले कुटुंबियांचे सांत्वन

गेवराई /प्रतिनिधी
तालुक्यातील मौजे मिरगाव येथील गोडबोले परिवारातील मायलेकीसह पुतणीचा गोदावरी पात्रात धुणे धुण्यासाठी गेले असताना पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाला होता. माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी गोडबोले परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. झालेली घटना आतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे सांगून त्यांनी गोडबोले परिवाराला धिर देत सांत्वन केले.
मौजे मिरगाव येथील सौ. रंजना भागवत गोडबोले, कु. आरती भागवत गोडबोले आणि कु. शितल हनुमान गोडबोले या बुधवार दिनांक २ जुन रोजी गोदावरी नदीपात्रामध्ये कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यांची मुलगी कु. आरती आणि पुतणी कु. शितल या दोघी पोहण्यासाठी पाण्यात गेल्या, पोहताना त्या बुडत असल्याचे पाहून सौ. रंजना त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात गेल्या आणि त्यांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली गेली, माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी गोडबोले कुटुंबाची भेट घेवून सांत्वन केले. सदरील घटना खुप वेदनादायी आहे. या घटनेत माय लेक आणि पुतणीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून गोडबोले परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गोडबोले परिवाराला आपण शासन स्तरावरुन मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत त्यांनी यावेळी गोडबोले परिवाराचे सांत्वन करुन धिर दिला. यावेळी सरपंच शिवाजी गोडबोले, माजी सरपंच सुभाषराव हुंबे, पोलीस पाटील भाऊसाहेब गोडबोले, प्रकाश हुंबे, माजी सरपंच भाऊसाहेब माखले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते