पाटोदा

धनगरजवळका शिवारात कंटेनर पलटी

पाटोदा/ प्रतिनिधी: तालुक्यातील धनगरजवळका पासुन व चुंभळी फाटा लगत हे कंटेनर पलटी झाल्याची घटना गुरूवार ( दि. २५) रोजी सायंकाळी ७:३० च्या दरम्यान घड़ली.

गुजरात वरून आंध्रप्रदेश कड़े केबल घेऊन जात असताना धनगरजवळका शिवारात समोरून येणाऱ्या ढंपर व ट्रक यांच्या ओव्हरटॅक मुळे कंटेनर पलटी झाले माहतरदेव गर्जे (ड़्रायव्हर ) यांनी कंटेनर रोड़ खाली घेण्याचा प्रयत्न केला परंतु अरूंद पुल असल्याकारणाने कंटेनर पलटी झाला. या मध्ये माहतरदेव गर्जे यांना मुका मार लागला पण जीव माञ वाचला. हा कंटेनर हातोला येथील शिवाजी भास्कर आघाव MH16CD9797 यांच्या मालकीचा असुन कंटेनरचे अंदाजे दीड़ लाखा पर्यंत नुकसान झाले आहे. घटनास्थळी पाटोदा पोलीस उशीरापर्यंत पोहचले नाहीत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!