क्राईम डायरीबीड

राखेचे टिप्पर सोडवण्यासाठी लाच घेताना दोन पोलिसांना पकडले

बीड/ प्रतिनिधी:

राखेची वाहतूक करणारे पकडलेली टिप्पर सोडविण्यासाठी सिरसाळा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी लाचेची (Bribe) मागणी केली होती. या प्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यावर बुधवारी (दि. 23) कारवाई करण्यात आली

परळी तालुक्यातील सिरसाळा पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी गजानन अशोक येरडलावर व उमेश यशवंत कनकावार यांनी एका एजंटच्या मार्फत तक्रार दाराकडे राखेचे टिप्पर सोडविण्यासाठी दोन हजार रुपये लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी तक्रारदाराने उस्मानाबादला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या प्रकरणी उस्मानाबाद एसीबीने सापळा रचत ही कारवाई केली. या प्रकरणी शिरसाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईने जिल्हा पोलिस दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!