क्राईम डायरीधारुर

दहा हजाराची लाच घेताना पोलिस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

किल्लेधारुर/ प्रतिनिधी:
गुन्ह्यात मदत करण्यासाठी एका पोलीस कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केली. तडजोड अंती दहा हजार रुपयांची लाच स्विकारताना त्यास रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.22) सायंकाळच्या सुमारास धारुर तालुक्यात करण्यात आली. विशेष म्हणजे विशेष पोलीस महानिरीक्षक जिल्ह्यात असताना ही कारवाई झाल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तेजस वाव्हूळे असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

धारुर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांनी तक्रारदारास गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्विकारतांना केज तालुक्यातील आडस परिसरात बीड एसीबीच्या टिमने रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे विशेष पोलीस महानिरीक्षक जिल्ह्यात असताना ही कारवाई झाल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, बीड उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बीडच्या टिमने केली.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!