केजक्राईम डायरी
शेतातून ऊस वाहतुकीचा लोखंडी छकडा चोरी

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील तांबवा येथे शेतात गोठ्या जवळून ऊस वाहतुकीसाठी वापरीत असलेला लोखंडी छकडा अज्ञातांनी चोरून नेला.
या बाबतची माहिती अशी की, दि. २३ मे ते २५ मे दरम्यान दत्तात्रय शिवाजी ढापकर रा. गांजपूर ता. केज यांनी तांबवा शिवारातील त्यांच्या शेतातील गोठ्या जवळ उभा करून ठेवलेला ट्रॅक्टरने ओढून ऊस वाहतुकीसाठी वापरण्यात येत असलेला लोखंडी छकडा अज्ञात चोरट्यानी चोरून नेला आहे. या बाबत दि. ३० मे रोजी दत्तात्रय शिवाजी ढापकर यांनी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात व्यक्ती विरुद्ध गु. र. नं. १९९/२०२२ भा. दं. वि. ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दिलीप गित्ते हे करीत आहेत.