केज
स्कॉर्पिओ, स्विफ्ट, बुलेटसह आकर्षक बक्षिसाचे आमिश दाखवून फसवणूक केल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

गौतम बचुटे/केज :- स्वतःच्या फायद्यासाठी लक्की ड्रॉ चे आयोजन करून चारचाकी वाहनासह इतर बक्षीसांचे आमिश दाखवून फसवणूक केल्या प्रकरणी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशानुसार चार ठका विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने आता जिल्ह्यातील अशा बदमाशांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. लवकरच त्यांना पोलीस ताब्यात घेण्याची कार्यवाही करणार आहेत.