क्राईम डायरीधारुर
आडस शिवारातून क्रेन चे दोन टोपले चोरी

धारूर/प्रतिनिधी:
तालुक्यातील आडस शिवारातून गाळ काढण्याच्या क्रेनचे लोखंडी दोन टोपले चोरी गेल्याची घटना दि. २३ रोजी पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी पोलीस गुन्हा दाखल झाला आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील केंद्रेवाडी येथील रहिवासी व हल्ली आयोध्या नगर केज येथे राहणारे प्रकाश वसंतराव केंद्रे (वय: ३८) यांच्या मालकीचे क्रेन आडस शिवारातील सर्वे नंबर १६९/१ मध्ये काम करीत होते. पहाटे कोणीतरी या क्रेन चे गाळ काढण्याचे लोखंडी दोन टोपले चोरून नेले. यामुळे त्यांचे ८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी प्रकाश केंद्रे यांच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस जमादार पुरी पुढील तपास करीत आहेत.