अंबाजोगाईक्राईम डायरी
महिलेचा विनयभंग करुन नातेवाइकांना मारहाण

युसुफवडगाव/प्रतिनिधि: एका ३० वर्षीय महिलेला प्रपोज करून तिचा विनयभंग केल्याची घटना केज तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शरद त्रिंबक शिंदे याने या महिलेस तू मला आवडतेस, मी तुझ्या पाठीमागे एक वर्षापासून आहे असे म्हणत त्याने वाईट हेतूने हात धरून विनयभंग केला. विनयभंग केल्याचा जाब विचारण्यास आलेल्या पीडित महिलेच्या नातेवाइकास आरोपीने धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिली.