अंबाजोगाई

केज-बीड रस्त्यावर वाहन अडवून नगदी रकमेसह पाऊण लाखाचा मुद्देमाल चोरी

गौतम बचुटे/केज :- केज बीड रोडवर पहाटे ४ ०० वा. च्या दरम्यान रस्त्यावर जॅक आडवा टाकून वाहन अडवून चाकुचा धाक दाखवून नगदी ४९ हजार रु. आणि २५ हजार रु. चे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. या प्रकारा नंतर अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी भेट दिली. तसेच या प्रकरणी चोरट्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांनी श्वान पथक घटनास्थळी पाचारण करून गुन्हेगारांचा मग काढण्याचा प्रयत्न केला आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. ७ मे शनिवार रोजी पहाटे ४:०० वा. लातूर जिल्ह्यातील निवाडा ता रेणापूर येथील लक्ष्मीकांत विश्वनाथ आप्पा उरकुंडे हे अहमदनगर येथील कार्यक्रम आटोपून निवाडा येथे जात असताना केज-बीड रोडवर पिंपळगाव फाट्या पासून पुढे मस्साजोग शिवारात रस्त्यावर वाहनांचा लोखंडी जॅक टाकला तो जॅक पाहून लक्ष्मीकांत उरकुंडे यांच्या वाहन चालकाने त्यांची गाडी रस्त्याच्या कडेला थांबविली. गाडी थांबताच सात ते आठ अनोळखी इसम गाडीजवळ आले त्यांनी गाडीच्या चालकाला उचलून रस्त्या जवळच्या शेतात नेऊन काठीने मारहाण केली. तसेच लक्ष्मीकांत उरकुंडे यांनाही मारहाण केली त्यांना चाकूचा धाक दाखवून दोघांच्या कडील २५ हजार रु. किंमतीचे सोन्याचं दागिने आणि नगदी ५९ हजार रु पळविले. या प्रकरणी लक्ष्मीकांत उरकुंडे यांच्या तक्रारी वरून दि. ७ मे रोजी अनोळखी चोरट्या विरुद्ध गु. र. नं. १६१/२०२२ भा. दं. वि. ३९५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे हे अधिक तपास करीत आहेत.

घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक यांची भेट :

घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी भेट दिली आणि तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना सूचना दिल्या.

श्वान पथकाला पाचारण

या वाटमारीची सखोल तपास करून चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलीसांनी श्वान पथकाला पाचारण केले आणि तपसासाठी श्वान पथकाचीही मदत घेतली जात आहे

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!