आष्टीक्राईम डायरी

बोगस बियाणे विक्री करणाऱ्या व्यापार्‍यावर गुन्हा

आष्टी/प्रतिनिधी:
पंचगंगा कंपनीच्या पाकिटातून कांद्याच्या बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या कडा ता. आष्टी येथील व्यापाऱ्यास कंपनीच्या अधिकाऱ्यांनी छापा मारून रंगेहात शुक्रवारी ( दि. १८) पकडले.

पंचगंगा कंपनीचे संचालक प्रशांत कुंडलीक माने यांनी याप्रकरणी आष्टी पोलिसात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीनुसार आष्टी तालुक्यातील कडा येथील गजानन कृषी सेवा केंद्रातून संचालक गणेश तागड हा पंचगंगा कंपनी च्या नावाचे पाकीट वापरून कांद्याच्या बोगस बियाणाची विक्री करत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्या माहितीची खातरजमा करण्यासाठी सहकाऱ्यांना घेऊन ते शुक्रवारी दुपारी कड्यात पोहोचले. सदर दुकानातून त्यांनी चौदाशे रुपये प्रति पाकीट दराने दहा पाकीट पंचगंगा कंपनी चे कांद्याचे बियाणे घेतली. त्या पाकटांची बारकाईने पाहणी केली असता ते बनावट असून त्यात इतर कांद्याचे बियाणे असल्याचे प्रशांत माने यांच्या लक्षात आले. याप्रकरणी गणेश तागड याच्यावर आष्टी पोलिसात शेतकरी आणि कंपनीची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक चाऊस करत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!