धारुर

वडिलांचे छत्र हरवलेल्या विद्यार्थ्यास शिक्षणासाठी शाळेने दिली सायकल भेट

आंबेवडगाव येथील शाळेचा उपक्रम

रवी गायसमुद्रे/किल्लेधारूर:  तालुक्यातील सोनिमोहा या गावातील शेख शाहिद मोहम्मद हा विद्यार्थी इयत्ता नववीच्या वर्गात आंबेवडगाव येथील न्यु हायस्कुल मध्ये शिकत होता. त्याच्या वडीलांचे अकाली निधन झाले. यामुळे शिक्षणाचा खर्च कशा करावा व शाळेत कसे जावे असा प्रश्न त्याला पडला होता. त्याचे शिक्षण बंद पडू नये व त्याला रोज जाणे येण्याची सोय व्हावी या उद्देशाने शाळेन या विद्यार्थ्यास सायकल भेट दिली आहे. यामुळे तो शाळेत येऊन शिक्षण घेऊ लागला आहे.

वडीलांचे आचानक निधन झाल्याने शेख शाहिद यास शिक्षणाचा खर्च कसा करावा? असा प्रश्न त्याच्या आईला व त्याच्या समोर उभा राहीला होता. शाळेला रोज ये-जा करण्यासाठी खर्च कुठून करायचा? यामुळे विद्यार्थी बेचैन झाला. वडील हयात होते तेव्हा त्याला ते स्वतःच्या गाडीवर शाळेला आणून सोडत. परंतु वडील मृत्युमुखी पावल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ लागली. सोनीमोहा ते आंबेवडगाव हे अंतर शेख शाहिद मोहम्मद हा रोज पायपीट करीत शाळेत येत असे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळेचे मुख्याध्यापक व सर्व स्टाफ यांनी विद्यार्थ्यांना सायकल भेट देण्याचे ठरवले. सर्वांनी वर्गणी करून विद्यार्थ्याला नवी हिरो हक्यूलस ही सायकल त्याला भेट दिली. यामुळे तो नियमित शाळेमध्ये येईल. शाळेचे मुख्याध्यापक सुभाष घोळवे, जेष्ठ शिक्षक आर. बी. सोळंके, पवार रणजित, नामदेव पांढरे, रामेश्वर बारगजे, बाळासाहेब चिमणगुंडे, सुरेश देशमुख, बबिता कदम, देशमुख अरूण, संजय कुलकर्णी, सिरसाट मामा सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्या विद्यार्थ्यास सायकल भेट देऊन त्याची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याची दहावी पर्यंतची पूर्ण शैक्षणिक जबाबदारी उचलून विद्यार्थ्यास मदत करण्याचे ठरवले. यामुळे शाळेच्या मुख्याध्यापक व स्टाफ यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

 

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!