साळेगाव येथे विद्यार्थिनींना सायकल वाटप

गौतम बचुटे/केज :- शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन आणि अभ्यासातील सातत्य हे यशाच्या शिखरा पर्यंत पोहोचविते त्या साठी मेहनत करायला हवी असे प्रतिपादन केज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी कुटे फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थिनींना सायकल वाटप प्रसंगी केले.
जिथे वाहनांची आणि रस्त्यांची कोणतीही सोय नाही अशा बिकट आणि कठीण परिस्थितीत शाळेत पायी प्रवास करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीसाठी कुटे फाउंडेशनच्या वतीने आणि पत्रकार अविनाशजी वाघिरकर यांच्या सहकार्याने सायकली वाटप करण्यात आल्या. त्या निमित्त दि. २२ मार्च रोजी शंकर विद्यालय साळेगाव येथील लाभार्थी विद्यार्थ्यांना पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्या हस्ते आणि भाजपचे जिल्हा सचिव दत्तात्रय धस आणि रिपाइंचे केज तालुका सरचिटणीस पत्रकार गौतम बचुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सायकली वितरित करण्यात आल्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याद्यापक प्रवीण देशपांडे हे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्र संचलन राजकुमार गित्ते यांनी तर आभार केंद्रे सर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला अकबर पटेल, मेहेत्रे सर, तांबारे सर, गालफाडे सर यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.