केजक्राईम डायरी

केज तालुक्यात पुन्हा दलित समाजाच्या महिलेचा अंत्यविधी रोखला 

तीन महिन्यातील तिसरी घटना : लालफितीच्या कारभारामुळे घटनेची पुनरावृत्ती

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील सोनेसांगवी शिर्डी या गावात मागासवर्गीय समाजाचे अंत्यविधी रोखण्याचा प्रकार वारंवार घडत असून याबाबत प्रशासनाने अद्यापही गांभीर्याने दखल घेतली गेली नसल्याने दलित समाजात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

या बाबतची माहिती अशी की केज तालुक्यातील सोनेसांगवी शिर्डी येथे दि. २६ मंगळवार एप्रिल रोजी अंबुबाई काशिनाथ साखरे वय ७५ वर्षे या महिलेचा वृद्धापकाळाने दुपारी ३०० वा. मृत्यू झाला. तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गावालगतच्या रिकाम्या शासकीय जागेत अंत्यविधीचे साहित्य घेऊन गेले असता त्या ठिकाणी राहणाऱ्या शेजारील शेतकऱ्यांनी त्याला प्रचंड विरोध केला असून अंत्यविधी करू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे अंत्यविधी रखडला आहे.

तीन महिन्यातील तिसरी घटना :-

या पूर्वी दि. ४ जानेवारी रोजी लक्ष्मीबाई शहाजी कसबे या ६५ वर्षीय मातंग समाजातील महिलेचे निधन झाले होते. तिचा अंत्यविधीही काही लोकांनी रोखल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी दि. ५ जानेवारी लक्ष्मीबाई कसबे हिचा मृतदेह ट्रॅक्टर मधून आणून केज तहसीलच्या आवारात ठेवला होता. त्या नंतर तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी सामाजिक कार्यकर्ते रमेश भिसे, रिपाइंचे तालुका अध्यक्ष दिपक कांबळे, रवींद्र जोगदंड, राष्ट्रवादीचे मुकुंद कणसे, सरपंच विजयकुमार इखे यांच्यासह ग्रामस्थ व मयताच्या नातेवाईकांशी चर्चा केली अंत्यविधी केला होता.

२. नंदूबाई नामदेव थोरात वय ५० वर्ष या मातंग समाजातील महिलेचे दि. ११ एप्रिल सोमवार रोजी निधन झाले. तिचाही अंत्यविधी रोखला गेला होता.

३. दि. २६ एप्रिल रोजीही अंबुबाई साखरे हिचा अंत्यविधी रोखला असून महसूल

व पोलीस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!