अंबाजोगाई
इंद्रमोहन केंद्रे गुरुजी यांचे निधन

अंबाजोगाई: येथील योगेश्वरी विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक इंद्रमोहन केंद्रे यांचे (वय: ७८)अल्पशा आजाराने बुधवारी ( दि. २) सकाळी निधन झाले.
त्यांनी येथील योगेश्वरी विद्यालयात अनेक वर्षे शिक्षक म्हणून काम केले. नोकरी करीत असतानाच त्यांनी एमए राज्यशास्त्र/लोकप्रशासन विषयात विद्यापीठात प्रथम येत गोल्ड मेडल मिळवले होते. त्यांच्या धावडी या मुळ गावी शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.