केज

अंबाजोगाई रोडवर दुचाकी व टेम्पोचा अपघात: दुचाकीस्वार जागीच ठार

गौतम बचुटे/केज :-  केज -अंबाजोगाई रोडवर उपजिल्हा रुग्णालय केज पासून सुमारे २०० मीटर अंतरावर दुचाकी व टेम्पोचा अपघात होऊन त्यात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री रात्री ९:३० वा. घडली.

या बाबतची माहिती अशी की केज-अंबाजोगाई रोडवर उपजिल्हा रुग्णालय केज पासून सुमारे २०० मिटर अंतरावर तांबवेश्वर फर्निचर या दुकाना समोर अंबाजोगाई कडून बीडच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो क्र. (एम एच२३/ए यु-२२९०) आणि केज कडून अंबाजोगाईच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी क्र. (एम एच-४४/आर-१७७४) या दोन वाहनांचा भीषण अपघात झाला.  अपघातात दुचाकीस्वार संतराम कावळे ( वय ४५ वर्ष) रा. परळी याच्या डोक्याला गंभीर स्वरूपाचा मार लागून रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती पत्रकार गौतम बचुटे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर मिसळे यांना दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशावरून पोलीस नाईक उमेश आघाव, मंगेश भोले, अशोक गवळी, हनुमंत गायकवाड हे अपघाताच्या घटनास्थळी हजर झाले. त्या नंतर प्रेत उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे हलविले आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!