अंबाजोगाई
शकुंतला काटे यांचे निधन

अंबाजोगाई-: येथील शकुंतला कालिदास काटे (वय-६८) यांचे २१ एप्रिल गुरुवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.
शुक्रवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर रविवार पेठेतील बोरूळ तलाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,तीन मुली,सुन, नातवंडे असा परिवार आहे.येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी कालिदास काटे यांच्या त्या पत्नी होत.