धारुर

किल्ले धारूर युथ क्लब सामाजिक संघटनेची नवीन कार्यकारणी जाहीर

अध्यक्षपदी विशालसिंह दिख्खत उपाध्यक्षपदी विश्वानंद तोष्णीवाल

किल्लेधारूर/प्रतिनीधी:  तालुका आणि शहरांमध्ये मागील अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारी सामाजिक संघटना किल्ले धारूर युथ क्लब यांच्या कार्यकारणीची दरवर्षी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला नवीन कार्य करण्याची घोषणा होत असते. याहीवर्षी किल्ले धारूर युथ क्लब ची नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.

यामध्ये अध्यक्ष म्हणून विशाल सिंह दिख्खत तर सचिव म्हणून महेश गवळी यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष विश्वानंद तोष्णीवाल यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्ष पदी दत्तात्रय गोरे , संघटक पदी सचिन सक्राते , सहसचिव पदी अमर औताडे , सहकोषाध्यक्ष पदी पवन धोत्रे, सहसंघटक पदी कपिल समर्थ यांची निवड करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात गतवर्षीचे युथ क्लब चे अध्यक्ष गौतमराव शेंडगे व सचिव रवि गायसमुद्रे यांनी मागील वर्षाच्या कार्याचा आढावा दिला तसेच निवड झाल्यानंतर नूतन अध्यक्ष विशाल दिख्खत, उपाध्यक्ष विश्वानंद तोष्णीवाल ,सचिव महेश गवळी यांनी येणाऱ्या वर्षांमध्ये कशाप्रकारे सामाजिक कार्य केले जाईल याविषयी आपापले मत मांडले या कार्यक्रमाला किल्ले धारूर युथक्लबचे संस्थापक संतोष प्रसाद दुबे ,माजी अध्यक्ष सुरेश शिनगारे, माजी अध्यक्ष सूर्यकांत जगताप, माजी उपाध्यक्ष अनिल प्रसाद तिवारी , माजी उपाध्यक्ष अभय सिंह चौहान तसेच इतर सर्व मान्यवर व सदस्य कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी अनेक वेळा युथ क्लब ला मार्गदर्शन करणारे कै. प्रा.मुकुंदराव सावंत सर यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!