शेतकरी व कष्टकरी यांच्या साठी जिव आहे तोपर्यंत संघर्ष करणार -विष्णुभाई घोलप

बीड़/प्रतिनिधी: पाटोदा तालुक्यातील घोलप वस्ती येथे गुरूवारी एक आगळी वेगळी पञकार परीषद झाली ती परीषद विष्णुभाई घोलप यांच्या थेट शेतामध्ये झाली . आजवर ज्या पञकार परीषदा होतात त्या शासकिय विश्रामगृहात किंवा शहराच्या प्रशस्थ ठिकाणी होताना दिसतात पण नवनिर्वाचित शेतकरी कामगार पक्षाचे बीड़ जिल्हा चिटणीस पदी निवड़ होताच विष्णुभाई घोलप यांनी कुठेही पञकार परीषद न घेता आपल्या शेतात पञकार परीषद घेऊन सर्व शेतकरी व कामगार यांचे मने जिंकली .
आम्ही जरी सत्तेत असलो तरी ही घाम गाळणार्या शेतमजुर शेतकरी बेरोजगार यांच्या विविध प्रश्नावर जिव आसे तो पर्यंत संघर्ष करू व न्याय मिळऊन देऊ. यावेळी घोलप म्हणाले की सध्या रब्बी ज्वारी व हरभर्याचा हंगाम संपला माञ अद्यापही शेतकर्यांना व कष्टकरी वर्गाला रोजगार हमी चे कामे चालु नसल्याने रोजगार मिळत नाही. शेतकरी आज मितीला अनुदान आणि पिक विमाच्या भोवताली पिंगा घालत आहे. शेतकर्याचा विकास कोसो दुर आहे. आज शेतकर्यांना बियाने व औषध कंपन्या तसेच रासायनिक खताच्या कंपन्या वेगवेगळ्या मार्गाने आर्थिक लुट करत आहेत. तसेच सुरक्षित बेरोजगार तरूणांना उद्योगासाठी बॅक कर्ज देत नाही त्यांना शासकीय नोकरी मिळत नाही. बीड़ जिल्ह्यात अनेक गंभीर प्रश्न आहेत ड़ोंगरी विकासाचे काही गावे शासनाने समाविष्ट करणे गरजेचे आहे. जेणेकरुन येथील विद्यार्थीना शिक्षणासाठी सवलत मिळेल, नोकरीसाठी प्राधान्य मिळेल आणि विकास कामासाठी शासणाचा निधी मिळेल. शेतकर्याच्या उभ्या पिकाचे नुकसान रानड़ुकरे, हरणे करत आहेत त्यांची नुकसान भरपाई शासणाकड़ुन मिळत नाही. आपल्या हक्काच्या मागण्यासाठी लढा देणे आज काळाची गरज असल्याचे विष्णुभाई घोलप यांनी सांगितले .
यावेळी जिल्हाचे बाळासाहेब घुमरे ,अभी लोंढे,सय्यद गफ्फार,तसेच वकील राजेन्द्र नवले तसेच मोठ्या प्रमाणात शेतकरी नेते व सर्व पञकार बांधव हजर होते .