क्राईम डायरीवडवणी

बायकोची फिर्याद का घेतली म्हणून पोलिसांशी वाद

वडवणी/प्रतिनिधी
‘बायकोची फिर्याद का घेतली, याचा तुम्हाला काय अधिकार’ असे म्हणत वडवणी पोलिस ठाण्यातील शासकीय वस्तूंची तोडफोड करुन जमादाराची गचांडी धरून झटापट केली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार दाखल केली आहे.
चारदरी (ता. धारूर) येथील उद्धव शिवाजी मुंडे (वय ३५) हा साेमवारी (दि. ७) दुपारी वडवणी ठाण्यात आला व पोलिस नाईक राम धारबा बारगजे (वय ३५) यांच्याशी हुज्जत घातली. माझ्या बायकोची फिर्याद तुम्ही का घेतली, तुम्हाला याचा काय अधिकार, असे म्हणत त्याने पोलिस नाईक राम बारगजे यांची गचांडी धरून शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकीही दिली. तसेच पोलिस ठाण्यातील सी.पी.यू.,मॉनिटर व प्रिंटर फोडून अंदाजे १० हजार रुपयांचे नुकसान केले. याप्रकरणी पोलिस जमादार राम बारगजे यांच्या फिर्यादीवरून आरोपी उद्धव शिवाजी मुंडेविरुद्ध वडवणी ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील तपास सपाेनि नितीन मिरकर करत आहेत

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!