क्राईम डायरीबीड

पुरवठा निरीक्षकास लाच घेताना पकडले

बीड/ प्रतिनिधी
येथील तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षकास दहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी ( दि. १५ ) दुपारी रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे .
बीड तहसील कार्यालयात पुरवठा विभागात निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले रवींद्र सुभाष ठाणगे यांच्या अनेक तक्रारी होत्या. मंगळवारी बीड लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे व त्यांच्या टीमने सापळा रचून सुभाष ठाणगे यांना दहा हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांना सुरू आहे

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!