केजक्राईम डायरी

डीजे लावून नाचणे पडले महागात ; 9 जणांवर गुन्हा

केज/प्रतिनिधी:
मित्राच्या वाढदिवसाला डीजे (डॉल्बी) लावून मोठ्या आवाजात गाणे वाजवून नाचत असताना तालुक्यातील बोबडेवाडी पोलिसांनी छापा मारला. मात्र पोलिसांना पाहून आरोपी पळून गेल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला. याप्रकरणी केज पोलिसात माजी सरपंचासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला ( DJ dance, case register ) आहे.

बोबडेवाडी येथे अमर भारत बोबडे याच्या वाढदिवसानिमित्त २७ जून रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास गावातील जिल्हा परिषद शाळेसमोर एका टेम्पोत डीजे डॉल्बी सिस्टिम लावून मोठ्या आवाजात गाणे वाजवून २० ते २५ जण नाचत असल्याची पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार दिनकर पुरी, पोलिस नाईक धनपाल लोखंडे, अशोक नामदास, मतीन शेख यांनी रात्री आठ वाजेच्या सुमारास अचानक छापा मारला. या ठिकाणी एक गजग्या रंगाच्या टेम्पोमध्ये ( एमएच २३ – २४८७ ) डीजे वाजवून १० ते १५ मुले नाचत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. माजी सरपंच संतोष क्षीरसागर, अमर भारत बोबडे, निरंजन बोबडे, अक्षय अर्जुन कोठुळे, ओम बाबासाहेब करपे, ज्ञानेश्वर शिवाजी बोबडे, गणेश महादेव आदमाने, तेजेस जनार्दन बोबडे, अण्णा बोबडे ( सर्व रा. बोबडेवाडी ) हे पोलिसांना पाहून पळून गेले. डीजे मालक महेश अनिलराव जाधव ( रा. प्रशांतनगर, केज) हा जागीच मिळून आल्याने टेम्पो, डीजे सिस्टिमसह त्याला ताब्यात घेतले आहे.

Show More
Back to top button
error: Content is protected !!