महाराष्ट्र

रुग्णावर शस्त्रक्रिया करताना, डॉक्टराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

औरंगाबाद: येथील स्टेशन रोडवर असलेल्या एका खाजगी रुग्णालयात रुग्णावर शस्त्रक्रिया करताना हृदयविकाराचा झटका आल्याने तरुण डॉक्टरचा मृत्यू झाल्याची ( Dead by heart attack) घटना रविवारी घडली. यामुळे संपूर्ण औरंगाबाद शहरात हळहळ व्यक्त होत आहे. दिग्विजय शिंदे ( वय ३८) असे या डॉक्टरांचे नाव आहे.

सिंदखेडराजा तालुक्यात मौजे ताडशिवणी येथील मूळ रहिवासी असलेले डॉ. दिग्विजय शिंदे ( MD Medicine) हे येथील स्टेशन रोडवर असलेल्या एका खाजगी रुग्णालयात रुग्णाची छोटी झालेली अन्न नलिका मोठी करण्याची शस्त्रक्रिया सुरू होती, यावेळी ते उपस्थित ( Standby) होते. याप्रसंगी त्यांच्यासोबत इतर डॉक्टर देखील हजर होते. शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुर्बिणीतून पाहत असताना डॉ. शिंदे यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. हे लक्षात येताच ऑपरेशन थेटरमध्ये उपस्थित डॉक्टरांनी त्यांच्यावर तात्काळ उपचार केले आणि त्यांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तात्काळ हृदयविकारतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. परंतू सर्व प्रयत्न विफल ठरले आणि डॉ. दिग्विजय शिंदे यांचा मृत्यू झाला. डॉ दिग्विजय शिंदे हे मुळचे सिंदखेडराजा तालुक्यातील मौजे ताडशिवणी येतिल डॉ दशरथ तुकाराम शिंदे यांचे धाकटे चिरंजीव होते. त्यांच्या अश्या अकाली निधनाने सिंदखेड राजा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!