अंबाजोगाई

शिवजयंती निमित्त शिक्षक मैत्री प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

अंबाजोगाई: शहरातील संकल्प विद्या मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आयोजित करण्यात आली होती. या जयंतीचे औचित्य साधून अंबाजोगाई शहरातील सामाजिक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक मैत्री प्रतिष्ठान यांच्या वतीने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेचे बक्षीस वितरण नुकतेच करण्यात आले . कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय दादा रापतवार होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून शांतिदूत शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा तथा शिवव्याख्याते ऍड दयानंद लोंढाळ , प्रतिष्ठानचे कार्यवाहक तथा तालुका क्रिडा समन्वयक दत्ता देवकते , प्रतिष्ठानचे ज्येष्ठ मार्गदर्शक विष्णू सरवदे, सचिव उमेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिजाऊ वंदना सह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिक्षक मैत्री प्रतिष्ठान आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक चि. सुशांत सौदागर निकम ,द्वितीय क्रमांक चि. ऋषिकेश काशिनाथ वाकडे तर तृतीय क्रमांक कु. शिवानी कालिदास ढाकणे तर वकतृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु.बरीरा पठाण जोहर , द्वितीय क्रमांक चि. अर्णव ढाकणे तर तृतीय क्रमांक सलोनी सौदागर निकम, वेशभूषा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु. शेप समीक्षा गोविंद, द्वितीय क्रमांक चि.लुंगेकर अर्णव बाळकृष्ण, तर तृतीय क्रमांक चि.परम विवेक खोडसे या विद्यार्थ्यांनी पटकावले .विजेत्या सर्व विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन मैत्री शिक्षक प्रतिष्ठान अंबाजोगाई यांच्या वतीने गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी अंबाजोगाई शहरातील सुप्रसिद्ध शिवव्याख्याते दयानंद लोंढाळ यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अनमोल असे मार्गदर्शन केले तर देवकते सर यांनी विद्यार्थ्यांना मार्मिक भाषेमध्ये मार्गदर्शन करून संस्थेचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी म्हणून स्वतः च्या हस्ते विद्यार्थ्यांना फुटबॉल बक्षीस देऊन शुभेच्छा दिल्या तर सरवदे सर यांनी शाळेला तीन मॅट भेट म्हणून दिल्या .
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना शिक्षक मैत्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष विजय रापतवार यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी असणाऱ्या गुणांपैकी आपण एक जरी गुण आत्मसात केला तर आपल्या जीवनाचं सार्थक झाल्या शिवाय राहणार नाही असेमार्मिक आवाहन केले . शिक्षक मैत्री प्रतिष्ठानची स्थापना ही सामाजिक कार्यासाठी झालेली आहे त्यासाठी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सदैव तत्पर असते अशी भावना विजय रापतवार यानी व्यक्त केली. तर शिक्षक मैत्री प्रतिष्ठानच्या वतीने शाळेला दोन सिमेंटचे बाक देऊन शाळेची कमकुवत बाजू भरून काढण्याचा प्रयत्न केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती कौशल्या शिंदे यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती प्रिया नायक यांनी केले तर आभार शामल सुरवसे त्यांनी व्यक्त केले . यावेळी विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या वेशभूषा धारण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच या
कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम ने करण्यात आली.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!