अंबाजोगाई
सौ.सारिका सोवितकर यांना पीएचडी प्रदान

अंबाजोगाई: येथील सौ.सारिका अशोक सोवितकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या वतीने संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागांतर्गत पीएचडी प्रदान करण्यात आली आहे.
“अँटोमेटेड अटेंडन्स अँप युजींग फेस रिकग्निशन अँन्ड व्हेरिफिकेशन” या विषयावर त्यांनी शोधप्रबंध सादर केला होता. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागातील डॉ. सीमा कवठेकर यांचे मार्गदर्शन लाभले.