अंबाजोगाई

डॉ इंद्रजित भगत यांच्या अनोरा या संपादित पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

अंबाजोगाई : यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई येथील वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाचे विभाग प्रमुख डॉ इंद्रजित रामदास भगत यांच्या अनोरा या संपादित पुस्तकाचे प्रकाशन दिनांक 26 मार्च 2022 रोजी करण्यात आले.

अनोरा या संपादित पुस्तकासाठी देशभरातून लेख मागविण्यात आले होते. या पुस्तकाला प्रतिसादात देशभरातून 18 राज्यांमधून एकूण 50 लेखकांनी 40 लेख पाठविले. या पुस्तका करिता जागतीक महिला दिनाचे औचित्य साधून प्रशासनात व नेतृत्वात महिलांचे स्थान: महीलांना भविष्यात जगात समानता प्राप्तीसाठी संधी हा मुख्य विषय समोर ठेवून लेख मागविण्यात आले होते. पुस्तकाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे व उद्घाटक प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब ठोंबरे यांनी संशोधनातून सामाजिक सुधारणे करिता दिशा प्राप्त होते. सांगताना विद्यार्थ्यांनी संशोधन कार्यात आवड निर्माण करावी व नवीन संशोधनातून देशाच्या समस्या व समृद्धी कडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी मंचावर प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ, राजेसाहेब औताडे, श्रीमती प्रतिभा देशमुख, सय्यद पाशू करीम, भाऊसाहेब गोविंद औताडे, सर नागेश जोंधळे, डॉ. दिलीप भिसे, डॉ. अनंत मरकाळें, डॉ सुरेश पाटील, डॉ संजय जाधव, डॉ अरविंद घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी उपस्थिती दर्शवली व डॉ. इंद्रजित भगत यांना भविष्यातील लिखाणासाठी शुभेच्छा दिल्या.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!