वाणिज्य विषयातील विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या अनेक संधी- परेश देशपांडे

अंबाजोगाई: मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई यांच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयातील वाणिज्य विभागाने आयोजित केलेल्या एक दिवसीय राष्ट्रीय ऑनलाईन संमेलनात “Institute of Company Secretary of India” चे अध्यक्ष परेश देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना प्रमुख मार्गदर्शन केले.
वाणिज्य विषयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी आणि रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी वाणिज्य विषय घेऊन आपले भवितव्य प्रगल्भ करावे असे मत मांडले. याप्रसंगी सी. ए. समृद्धी लूनावत यांनी उपस्थितांना उत्पन्न कर कायदा याविषयी विशेष मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ धर्मराज तांदूळजेकर यांनी ‘अर्थव्यवस्था गतिमान ठेवण्यासाठी वाणिज्य चे शिक्षण महत्त्वाचे आहे विद्यार्थ्यांचा वाणिज्य विषयाकडे कल वाढतो आहे.’ असे मत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी संपूर्ण देशातून विविध राज्यातील प्राध्यापकांनी, संशोधकांनी, शिक्षकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे आयोजक वाणिज्य विभाग प्रमुख डॉ इंद्रजित रामदास भगत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सि. एस. अंजली बुधानी यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार डॉ. धनंजय खेबडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेख असेफ, करण मोरे, अमोल सोळुंके यांनी विशेष परिश्रम घेतले.’