आठ जुगारी रंगेहाथ पकडले

अंबाजोगाई/ प्रतिनिधी:
शहरातील मांजरा वसाहती समोर असलेल्या बी.एड कॉलेजच्या भिंतीआड जुगार खेळणाऱ्या आठ जुगान्यांना अंबाजोगाई शहर पोलिसांनी शनिवारी (२६ जून) दुपारी ताब्यात घेतले. शहर पोलिसांना बी.एड कॉलेजजवळ काही व्यक्ती जुगार खेळत आल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्याआधारे शहर पोलिसांनी शनिवारी सदर ठिकाणी छापा मारला असता तिथे कॉलेजच्या भिंतीच्या आडून मोकळ्या पटांगणात ८ जुगारी तिर्रट नावाचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी हिंदुस्तान बाबासाहेब मोरे, भारत तिवारी मोरे, अशोक श्रीरंग मोरे, शशिकांत अप्पासाहेब मोरे, सुरज अशोक निंबाळकर, अविनाश सुधाकर मोरे, बालाजी प्रकाश पालकर, विलास हनुमंत मोरे (सर्व. रा. मोरेवाडी, अंबाजोगाई) या ८ जुगान्यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून १० हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पो.शि. रमेश ठोंबरे यांच्या फिर्यादीवरून त्या ८ जणांवर शहर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पो.ह. येलमाटे करत आहेत.