केजजिल्ह्याचं राजकारण

केज नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष निवडीत भीम अनुयायास प्रधान्य द्यावे- रिपाइंचे प्रसिद्धी पत्रक

गौतम बचुटे/केज :- सरकारच्या अनास्थेमुळे ओबीसींना आरक्षण गमवावे लागले आहे. तसेच केज नगर पंचायतीचे नगराध्यक्ष पद हे अनुसूचीत जाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे. त्यासाठी भीम विचाराच्या व पुरोगामी विचारसरणीच्या नगरसेवकाला या पदावर बसवून सन्मान करायला हवा. अन्यथा यासाठी तालुक्यातील आंबेडकरी विचारांचा मतदार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत प्रतिगाम्यांना त्यांची जागा दाखवेल. असा ईशारा रिपाइं (ए)चे केज तालुका अध्यक्ष दीपक कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

राज्यात झालेल्या सार्वत्रिक नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीमध्ये सरकारच्या  दुर्लक्षीतपणा व बेजबाबदार भुमिकीमुळे ओबीसी समाजाला राजकीय आरक्षणातुन निवडणुक लढण्याची संधी न मिळाल्यामुळे त्यांना राजकीय अधिकारापासुन वंचीत रहावे लागले आहे. जिल्हयात झालेल्या सार्वत्रिक नगरपंचायत निवडणुकीत केज येथील नगरपंचायत निवडणुक नगराध्यक्ष पदासाठी अनुसुचीत जातीसाठी नगराध्यक्ष हे पद आरक्षीत आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, केज जनविकास परिवर्तन आघाडी यांना रिपाइंचे च्या वतीने तालुका अध्यक्ष दिपक कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन करण्यात येती की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातुन दिलेले आरक्षण हे मागासवर्गीय लोकांच्या उन्नतीसाठी व प्रगतीसाठी आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षीत असलेल्या भिम विचाराच्या अनुयायाचीच नरगरध्यक्षपदी निवड करण्यात यावी. परंतु राजकीय स्वार्था पोटी तांत्रीक जातीय आधार देऊन केज शहराच्या नगरध्यक्षपदी बसविण्यात येऊ नये. अन्यथा केज तालुका रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (A) येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जातीवादी विचाराच्या पक्षाला त्यांची जागा दाखवुन दिल्या शिवाय राहणार नाही. स्वत:ला पुरोगामी म्हणाऱ्या राजकीय पक्षांनी नोंद घ्यावी. असा ईशारा दिला आहे. प्रसिद्धी पत्रकावर तालुका अध्यक्ष दिपक कांबळे यांच्यासह जिल्हा सल्लागार उत्तमअप्पा मस्के, जिल्हा संघटक रवींद्र जोगदंड, जेष्ठ नेते राहुल सरवदे, उपाध्यक्ष विकास आरकडे, शहराध्यक्ष भास्कर मस्के, सचिव गौतम बचुटे, दिलीप बनसोडे, मसू बचुटे, मिलिंद भालेराव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!