पर्यावरणाचे रक्षण केले तरच आपले भविष्य उज्ज्वल आहे- डॉ इंद्रजीत भगत

अंबाजोगाई: माझी वसुंधरा अभियान”अंतर्गत यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी यशवंतराव चव्हाण चौक येथील स्मशान भूमी परिसर स्वच्छता व वृक्ष संवर्धन करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित स्वच्छता व पर्यावरण संरक्षण मोहिमेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
स्मशानभूमी परिसरात असलेल्या प्लास्टिक, पॉलिथिन पिशव्या, फुल हार, व इतर अविद्राव्य घटकांना यावेळी स्मशानभूमी परिसरातून जमा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. परिसर स्वच्छ करताना विद्यार्थ्यांनी “करूया पर्यावरणाचे रक्षण, कमी करून प्रदूषण.” “ठेऊया पर्यावरणाचे ध्यान, नाहीतर होईल आपलेच. नुकसान.”
“निरोगी असेल धरा तर सुख नांदेल घरा-घरा.” “देईल आपल्याला औषध पाणी, पर्यावरणाची करा निगराणी.” अशा विविध घोषवाक्यांनी परिसरात उत्साह निर्माण केला. कार्यक्रम अधिकारी इंद्रजीत भगत यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना “प्रत्येकाने एक तरी झाड दरवर्षी लावले पाहिजे. सार्वजनिक वृक्ष लागवड, सामाजिक वनिकरण, स्वच्छता अभियान, प्रदूषण नियंत्रण यांसारखे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे.” असे व्यक्त करताना पर्यावरण संवर्धनाचा निर्धार करूण्यास सुचविले. याप्रसंगी 18 स्वयंसेवकांसह कार्यक्रमाधिकारी डॉ इंद्रजीत रामदास भगत, श्रीपाद कदम, नरेंद्र चोले यांनी विद्यार्थ्यांना स्मशानभूमी परिसर स्वच्छता वृक्षसंवर्धन मोहीमेला मार्गदर्शन केले.