अंबाजोगाई

अंबाजोगाई तालुक्यात साडेतीन हजार विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

आठ मुख्य तर दहा उपकेंद्रावर होणार परीक्षा

अंबाजोगाई:  यावर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी बोर्डाची परीक्षा ४ मार्च पासून सुरु होत आहे. यासाठी अंबाजोगाई तालुक्यातील ३ हजार ४४९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा तालुक्यातील ८ मुख्य व १० उपकेंद्रावर होणार आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रथमच उपकेंद्राची नियोजन या वर्षी करण्यात आले आहे.

कोरोना महामारी च्या भितीमुळे यावर्षी बारावी बोर्डाची परीक्षा होते किंवा नाही असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये होता. परंतु शासनाने ही परीक्षा ऑफलाईनच होणार असे जाहीर केल्यानंतर या परीक्षेचे नियोजन पूर्ण झाले आहे. ही परीक्षा येत्या ४ मार्चपासून सुरू होत आहे या परीक्षेसाठी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी एकाच परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची गर्दी होऊ नये यासाठी ज्या मुख्य केंद्रात इतर शाळा- कॉलेजचे विद्यार्थी परीक्षा देत होते अशा शाळा कॉलेजना परीक्षा उपकेंद्राचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे एकाच केंद्रावर विद्यार्थ्यांची गर्दी होणार आहे. यावर्षी अंबाजोगाई तालुक्यात ८ मुख्य केंद्र तर १० उपकेंद्रावर ही परीक्षा होणार आहे. ही परीक्षा तालुक्यातील ३ हजार ४४९ विद्यार्थी देणार आहेत. यासाठी शिक्षण विभागाकडून नियोजन पूर्ण झाले असून परीक्षा घेण्यासाठी शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. नव्याने रुजू झालेले गटशिक्षणाधिकारी रंगनाथ राऊत यांच्यावर ही परीक्षा घेण्याची जबाबदारी आहे.

मुख्य परीक्षा केंद्र व त्याला जोडलेले उपकेंद्र

अ. क्र. मुख्य परीक्षा केंद्र

उपकेंद्र

1 योगेश्वरी महाविद्यालय, अंबाजोगाई     शासकिय तंत्र विद्यालय, अंबाजोगाई
2 स्वाराती महाविद्यालय, अंबाजोगाई जोधा प्रसाद मोदी विद्यालय, अंबाजोगाई
3 यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई   व्यंकटेश विद्या मंदीर, अंबाजोगाई
4 खोलेश्वर महाविद्यालय, अंबाजोगाई  मिलिया हायस्कुल, अंबाजोगाई
5 मुकुंदराज विद्यालय, अंबाजोगाई     डॉ. मोहम्मद इक्बाल हायस्कुल, अंबाजोगाई
6 सोमेश्वर विद्यालय, घाटनांदुर     रेणुका विद्यालय, बर्दापुर
7 वसुंधरा विद्यालय, घाटनांदुर 

 विवेक विद्यालय, बर्दापुर

8 जयकिसान विद्यालय, आपेगाव

1. वसुंधरा कनिष्ठ महा. वि. लोखंडीसावरगाव

2. संभाजी बडगीरे विद्यालय, ममदापुर

3. वसुंधरा कनिष्ठ महा. वि. देवळा

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!