अंबाजोगाई

तहसील कार्यालयात खाते उघडण्याची सोय

अंबाजोगाई/ प्रतिनिधी:
सामाजिक अर्थ सहाय्य योजनेत समाविष्ठ असलेले संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ अनुदान योजना, इंदिरा गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत अंबाजोगाई शहरातील ज्या पात्र लाभार्थी यांचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते नाहीत त्यानी तहसील कार्यालय अंबाजोगाई येथे येऊन आपले बँक खाते उघडून घ्यावेत. सोबत येतांना

१) तिन पासपोर्ट साईझ फोटो
२) आधार कार्ड झेरॉक्स
३) पॅन कार्ड झेरॉक्स

घेवून येऊन आपले बँक खाते उघडून घ्यावेत असे आवहान तहसीलदार डॉ.विपीन पाटील यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!