माजलगाव

मोगरा येथे बोगस डॉक्टर पकडला !

माजलगाव/ प्रतिनिधी
तालुक्यातील मोगरा येथे कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसताना रुग्णांवर उपचार करणाऱ्या एका बोगस डॉक्टरावर बुधवारी दिंद्रुड पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

मोगरा येथे कुठलीही परवानगी नसतांनाही किंवा वैद्यकीय डिग्री नसताना एक व्यक्ती रुग्णावर उपचार करत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मिळाली. त्यांच्या सूचनेनुसार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुकर घुबडे यांनी गंगामसला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या मोगरा गावात कारवाई करावी असे आदेश दिले. त्यानुसार वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप बटुळे यांनी बुधवारी नायब तहसीलदार भंडारे, आरोग्य सहाय्यक पी. एम. जगनाडे या पंचासक्षम मोगरा गावात एका खोलीची झडती घेतली असता तेथे आकाश विश्वास हा व्यक्ती रुग्णाला उच्चार करताना आढळून आला. त्यास कागदपत्रे मागितली असता ती नसल्याचे त्यांनी सांगितले. याठिकाणी ऍलोपॅथी औषधी, गोळ्या, इंजेक्शन व रुग्ण तपासणीचे साहित्य असे 35 हजार रुपयांचे साहीत्य आढळून आले. त्याचा पंचनामा करून दिंद्रुड पोलिस ठाण्यात विश्वास याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!