केजक्राईम डायरी
शेतकऱ्याचे डोके फोडले

केज/प्रतिनिधी:
बांधावर दगडाची पवळ का टाकली, अशी विचारणा केल्याच्या कारणावरून शेतकरी श्रीकांत बापूराव गदळे (३३) यास मारहाण करुन दगडाने डोके फोडले. ही घटना सोमवारी (दि.२१) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास दहिफळ वडमाऊली येथे घडली. यावेळी त्यांच्या वडिलांनाही लाथाबुक्क्याने मारहाण करण्यात आली. दत्तू गदळे, परमेश्वर गदळे, बाबू गदळे, बाळू गदळे यांच्यावर केज पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला. हवालदार मुकुंद ढाकणे हे तपास करत आहेत.