क्राईम डायरीबीड
पिंपळवाडी येथे शेतकऱ्यास कुऱ्हाडीने मारहाण

बीड/ प्रतिनिधी:-
शेतीच्या वादातून दोघांनी शेतकऱ्याला कुर्हाडीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना पिंपळवाडी येथे शनिवारी घडली. याप्रकरणी दोघांवर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकरी जगन्नाथ एकनाथ बहिरवाळ (वय ७०) यांची पिंपळवाडी येथे शेती आहे. आपल्या शेतीतील ऊस त्यांनी त्यांच्या जनावरांना टाकला. मात्र कृष्णा कान्हू बहिरवाळ आणि केशव यांनी आता हे शेत आम्हाला दे. तू ऊस तोडू नको, असे म्हणून कुन्हाड, दगडाने मारहाण करत गंभीर जखमी केले. शेतकन्याच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नेकनूर पोलीसांनी जिल्हा रुग्णालयात येऊन जगताप यांची तक्रार नोंदवत मारहाण करणाऱ्या कृष्णा आणि केशव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.