केजक्राईम डायरी

दहिफळ येथे शेतकऱ्याचे डोके फोडले; चौघांवर पोलिसांत गुन्हा

केज/प्रतिनिधी:

बांधावर दगडाची पवळ का टाकली अशी विचारणा केल्याच्या कारणावरून एका ३३ वर्षीय शेतकऱ्यास दगडाने मारहाण करीत डोके फोडल्याची घटना केज तालुक्यातील दहिफळ (वड माउली ) येथे घडली. याप्रकरणी केज पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

दहिफळ ( वड माउली ) येथील शेतकरी श्रीकांत बापूराव गदळे (वय ३३ ) व त्यांचे वडील हे सोमवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या मुकुटमाळ नावाच्या शेतात पेरणीसाठी गेले होते. श्रीकांत गदळे यांनी दत्तु यशवंता गदळे यांना आमच्या बांधावर पवळ का टाकली असे विचारले असता दत्तू यांनी शिवीगाळ करीत गचांडी धरली. तर परमेश्वर दत्तु गदळे याने दगडाने मारहाण करून श्रीकांत गदळे यांचे डोके फोडले. बाबू यशवंता गदळे, बाळू बाबू गदळे या दोघांनी त्यांना व त्यांच्या वडिलांना लाथाबुक्क्याने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद श्रीकांत गदळे यांनी दिल्यावरून दत्तु गदळे, परमेश्वर गदळे, बाबू गदळे, बाळू गदळे या चौघांविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. मुकुंद ढाकणे पुढील तपास करत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!