केजक्राईम डायरी
रुमणे मारून शेतकऱ्याचा पाय मोडला

केज/प्रतिनिधी:
भाटुंबा येथील संभाजी छबूराव चवरे (६५) हे १२ जून रोजी दुपारी शेतातील घरासमोर उभे असताना ऋषिकेश गुंडिबा चवरे, सीताराम वसंत चवरे, ओमकार बळीराम चवरे, महादेव दगडोबा चवरे, सुदर्शन गुंडिबा चवरे, योगेश सीताराम चवरे तिथे अाले. तुझ्या नात सुनेने उसाची काकरी का मोडली असे विचारत शिवीगाळ केली, ऋषिकेशने रुमणे मारून संभाजी चवरेंचा पाय मोडला. तर इतर आरोपींनी संभाजी चवरे व त्यांच्या कुटुंबातील इतर लोकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. संभाजी चवरेंच्या फिर्यादीवरून ६ जणावर युसूफवडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.