वाहनाच्या धडकेत बाप-लेकाचा मृत्यू!

रेणापूर जि. लातुर: अज्ञात वाहनाची धडक बसल्याने दुचाकीस्वार वडिलांसह पाठीमागे बसलेल्या मुलाचा राष्ट्रीय महामार्गावरील श्रीराम विद्यालयानजीक काही अंतरावर मंगळवारी (दि.८) रात्री १०.३० च्या सुमारास मृत्यू झाला.
रेणापूर येथील राहूल गोंविद सुरवसे (वय ३६ ) यांचा खरोळा (ता रेणापूर) येथे हॉटेल (ढाबा) असून रोजच्या प्रमाणे ते व त्यांचा मुलगा विश्वजित राहूल सुरवसे (वय १२) हे मंगळवारी (दि.८) खरोळा येथे असलेले हॉटेल (ढाबा) चा व्यवसाय करुन ते रेणापूर येथे दुचाकीवरून आपल्या घरी परत येत असताना, महामार्गवर असलेल्या शहरातील श्रीराम विद्यालयानजीक १०० फुट अंतरावर मंगळवारी (दि.८) रात्री १०.३० च्या सुमारास अज्ञात वाहनांची त्यांच्या दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीस्वार राहुल सुरवसे यांच्या छातीला, पोटाला व त्यांचा मुलाच्या डोक्याला जबर मार लागल्याने दोघेही गंभारी जखमी झाले. या आपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत नागरिकांच्या मदतीने जखमी बाप-लेकास उपचारासाठी रेणापूर येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी सईद शेख यांनी दोघांची तपासणी करून मृत घोषित केले. या अपघातात बाप-लेकाचा मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघातात मयत राहूल सुरवसे व त्यांचा मुलगा विश्वजीत सुरवसे या दोघांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.