पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली वाघळूज येथे जुगार अड्ड्यावर धाड : अडीच लाखाचा मुद्देमाल ताब्यात

गौतम बचुटे/केज :- आष्टी तालुक्यातील वाघळूज शिवारात पंकज कुमावत यांनी एका हॉटेल मध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून अडीच लाख रु. चा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
दि. ४ मार्च शुक्रवार रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना माहिती मिळाली की, कडा ते अहमदनगर जाणारे रोडवर अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाघळूज शिवारात हॉटेल साईभक्ती मध्ये अशोक एकनाथ खकाळ हा त्याच्या स्वतःचे फायदा करिता काही लोकांना एकत्र जमवून जन्ना-मन्ना नावाचा पत्त्याच्या जुगार खेळवीत असल्याची माहिती मिळाली. जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी ही माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना कळविली. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक रश्मीता राव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील अमंलदार यांच्या पथकाने सायंकाळी ४:३० धाड टाकली. त्या वेळी तेथे १८ जुगारी जन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळताना पोलीस पथकांना आढळून आले. त्यांच्याकडील ४८ हजार ४३० रु. नगदी जुगाराचे साहित्य, चार मोटार सायकली आणि ९ हजार ८७८ रु. ची देशी व विदेशी दारू असा एकूण २ लाख ५३ हजार ४०८ रु. चा मुद्देमाल ताब्यात घेतला. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस जमादार बालाजी दराडे यांच्या फिर्यादी वरून १८ जुगाऱ्या विरुद्ध अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या जुगार अड्ड्यावर कार्यवाहीत परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक रश्मीता राव यांच्यासह पोलीस जमादार बालाजी दराडे, राजू वंजारे, दिलीप गित्ते, संजय टूले, महादेव बहिरवाळ, सखाराम घोलप, अविनाश घुंगट हे पथकात सहभागी होते.