पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांना रिपाइंच्या वतीने निरोप

गौतम बचुटे/केज :- केज येथे पोलीस निरीक्षक म्हणून सेवा बजावलेले पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ हे विहित वयोमर्यादे नुसार सेवानिवृत्त झाले आहेत. त्या बद्दल त्यांचा केज तालुका रिपाईंच्या वतीने निरोप देण्यात आला.
सन २०१५ ते २०१७ दरम्यान केज येथे पोलीस निरीक्षक म्हणून सेवा बजावलेले पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ हे दि. २८ फेब्रुवारी रोजी विहित वयोमर्यादे नुसार अहमदपूर येथून सेवानिवृत्त झाले. त्या निमित्त केज तालुका रिपाईंच्या वतीने त्यांच्या अजिंक्य सिटी लातूर येथील निवासस्थानी त्यांना पुष्प गुच्छ व शाल देऊन निरोप देण्यात आला. सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ हे अत्यंत कर्त्याकठोर आणि शिस्तीचे अधिकारी आहेत. त्यांच्या कार्यकाळात अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपींना न्यायालताने शिक्षा ठोठावली आहे. तसेच त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता. त्यामुळे पोलीस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली. तसेच त्यांचा स्वभाव हा अत्यंत मनमिळावू असल्याने त्यांचे अधिनिस्त अधिकारी व कर्मचारी हे त्यांच्या कार्यपद्धतीवर समाधानी असत. दरम्यान त्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी रिपाइंचे केजचे शहराध्यक्ष भास्कर मस्के, माजी तालुका अध्यक्ष राहुल सरवदे, तालुका सचिव पत्रकार गौतम बचुटे, पत्रकार महादेव गायकवाड, जकीयोद्दीन इनामदार हे उपस्थित होते.