ना. रामदास आठवले यांचा केज रिपाईंच्या वतीने सत्कार

गौतम बचुटे/केज: केज येथे केंद्रीय मंत्री ना. रामदासजी आठवले व युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांचा केज तालुका रिपाइंच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या बाबतची माहिती अशी की, केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना. रामदासजी आठवले हे अंबाजोगाई येथील खोलेश्वर महाविद्यालयाचे सेवा निवृत्त प्राचार्य प्रा. डॉ. कमलाकर कांबळे यांच्या सेवा समाप्ती निमित्त निरोप समारंभाचा कार्यक्रम आटोपुन केज मार्गे औरंगाबाद विमानतळावर जात असताना केज तालुका रिपाइंचे तालुका अध्यक्ष दिपक कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष गोवर्धन वाघमारे, जिल्हा सल्लागार उत्तमअप्पा मस्के आणि जिल्हा संघटक रवींद्र जोगदंड यांच्या आदेशा वरून ना. रामदासजी आठवले आणि युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पूजी कागदे यांचा पुष्पगुच्छ देऊन शहराध्यक्ष भास्कर मस्के, सचिव गौतम बचुटे, बाळासाहेब ओव्हाळ, राहुल सरवदे, रणजित कांबळे, दिलीप बनसोडे, सचिन मस्के, साजेद इनामदार आणि विकास आरकडे रमेश निशिगंध, कैलास जावळे आणि कार्यकर्ते यांनी सत्कार।केला. या प्रसंगी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.