अंबाजोगाई

डॉ. श्रद्धा राऊत व डॉ. अश्विनी महामुनी यांचा गुणगौरव

अंबाजोगाई: येथील डॉ. श्रध्दा केशव राऊत हीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेत ओबीसी महिला प्रवर्गातुन पहिला येण्याचा मान मिळवल्याबद्दल तर डॉ. अश्विनी पद्माकर महामुनी हिचा न्यूरो सर्जरी साठी भारत देशातून २५ वी रँक मिळवल्याबद्दल अंबाजोगाई पिपल्स बँक, राष्ट्रवादी काँग्रेस तथा राजकिशोर मोदी मित्र मंडळाकडून शनीवारी (दि. 4) सत्कार करण्यात आला.

डॉ. श्रध्दा राऊत हिचे शालेय शिक्षण अंबाजोगाईच्या योगेश्वरी संस्थेत झाले. त्यानंतर तिने उदगीरच्या महाविद्यालयातून पशु वैद्यकीय अभ्यासक्रमात पदवी प्राप्त केली असून सध्या पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. या दरम्यान तिने एमपीएससीची परिक्षा दिली होती. या परिक्षेचा निकाल शुक्रवारी लागला असून डॉ. श्रध्दा राऊत हिने ओबीसी महिला प्रवर्गात पहिला क्रमांक मिळवला आहे. तिची निवड आता पशूवैद्यकीय अधिकारी वर्ग-१ या पदावर झाली आहे. विशेष म्हणजे तिने पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळविले आहे.

अश्विनी महामुनी चे १० पर्यंत चे शिक्षण देखील योगेश्वरी शाळेतच झाले असून बारावी ही शाहू कॉलेज लातूर येथून उत्तीर्ण झाली असून एम बी बी एस जे जे हॉस्पिटल मुंबई येथून पूर्ण केले आहे. तसेच कऱ्हाड येथील के एम एस वैद्यकीय महाविद्यालयातून एम एस पूर्ण केले आहे. डॉ .अश्विनी महामुनी हिने न्यूरो सर्जरी मधून देशात २५ वी रँक मिळविल्याबद्दल त्यांच्यावर राजकिशोर मोदी मित्र मंडळ तसेच अन्य विविध सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणा चव्हाण यांनी तर आभार गोविंद पोतंगले यांनी व्यक्त केले.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!