महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंंय

गौतम बचुटे/केज :- एका १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचे फोटो सोशल मीडियाच्या स्टेट्सवर टाकुन आणि तिचा वाईट हेतूने हात धरून विनयभंग केल्याची घटना घडली असून पोलिसांनी त्या नराधमास अटक केली आहे.
केज तालुक्यात एका १८ वर्षीय तरुणी ही महाविद्यालयात जात असताना सोमेश्वर संदीपान महाडीक याने मोबाईलद्वारे तिचे फोटो काढले. ते फोटो व्हाट्सअप स्टेट्स वर ठेवले. तसेच तिचे मामा व चुलते यांच्या मोबाईल व्हाट्सअपवर पाठविले. त्याने त्या तरुणीचा वाईट हेतुने हात धरून तिचा विनयभंग केला.
दि. ५ मे रोजी त्या तरुणीने केज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार नराधम सोमेश्वर संदीपान महाडिक याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. १५६/२०२२ भा. दं. वि. ३५४, ३५४(अ), ३५४(ड), ४५२, ५०६ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(सी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी सोमेश्वर संदीपान महाडीक याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे हे स्वतः या प्रकरणाचा तपास करीत आहेत.